‘माणसाची हातभर फुटल्यानंतर काय अवस्था होते, हे संजय राऊत यांना पाहिल्यानंतर समजतं’

Chandrashekhar Bawankule : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मकाऊमध्ये कसिनो खेळत असल्याचं सांगत एक फोटो शेअर केला आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळेंचे (Chandrashekhar Bawankule) मकाऊ कॅसिनो(Macau Casino) मधील 27 फोटो आणि 5 व्हिडीओ आपल्याकडे आहेत असा दावा देखील त्यांनी केला आहे. या फोटोमुळे राजकीय विश्वात खळबळ उडाली आहे.

संजय राऊतांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. बावनकुळे यांच्यावर घाणेरडी टिप्पणी करता, तुमच्या मालकाचा मुलगा काही संत नाही अशा शब्दात नितेश राणे यांनी टीका केली.

आमदार नितेश राणे म्हणाले की, माणसाची हातभर फुटल्यानंतर काय अवस्था होते, हे संजय राऊत यांना पाहिल्यानंतर समजतं. मकाऊमध्ये जाऊन बावनकुळे यांनी काय चुकीचं केलं हे समजत नाही. बावनकुळे हे आपल्या कुटुंबासोबत गेले. कोण एन्जॉय करत असेल तर काय चुकीचं आहे? बावनकुळे स्वत:च्या कुटुंबा सोबत गेलेले. संजय राऊत बाहेर जाताना स्वतःचं कुटुंब घेऊन जातात का? यावर आपण पूर्ण एपिसोड करू शकतो. म्हणून एवढा थयथयाट करायची गरज नाही असे राणे यांनी म्हटले आहे.

संजय राऊत चीनला कोणासोबत गेले ते सांगू का? तुमच्या मालकाचा मुलगा दिनू मोरयाच्या मांडीवर बसून कुठल्या हळदीचं दूध पीत होता. त्याचा ब्रँड सांगू का? संजय राऊत यांचा एका खासदार सोबत नाचताना व्हिडीओ त्यांच्या कुटुंबाने पाहिला तेव्हा घरात काय काय झालं हे त्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली जाईल. बावनकुळे स्वतःच्या कुटुंबासोबत गेले, ते स्पष्टीकरण द्यायची हिंमत ठेवतात, फोटो दाखवण्याची हिंमत ठेवतात. संजय राऊत यांनी स्वतःच्या कुटुंबासोबत गेल्याचे एक तरी फोटो दाखवावा. रशियन बहिणीसोबत काढलेला तो फोटो दाखवायचा का?. व्हिडीओ दाखवायची स्पर्धा करायची असल्यास मैदानात या. महाराष्टातील राजकारण किती खालच्या पातळीवर घेऊन जायचं या नागड्या माणसाला एकदा विचारायचं आहे. तुमच्या घरामध्ये तुमची किती किंमत आहे हे आम्हाला माहिती आहे. संजय राऊत यांची माहिती जेव्हा द्यायला लागू तेव्हा त्यांच्या घरचे चपलाने मारतील अशी टीका देखील राणे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

वर्ल्ड कप जिंकवून देण्यात अपयशी ठरलेल्या राहुल द्रविडचे काय होणार ? टीम इंडियाला मिळणार नवीन प्रशिक्षक ?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊमधील कॅसिनोमध्ये एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उडवले – राऊत

भारतात करोडपतींची संख्या वाढली, करोडो रुपयांच्या Mercedes, Audi, Lamborghini खरेदीची शर्यत लागली