‘भानगडी सोडल्या तर काय मिळालं पवारांमुळे महाराष्ट्राला याचा कधी तरी विचार करा’

मुंबई – काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. यावेळी काही आंदोलकांनी चपला फेकल्या व शरद पवार यांच्या नावाने अश्लाघ्य भाषेत घोषणा दिल्या. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर आता तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, या अचानक घडलेल्या घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून यावर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्यात मश्गुल आहेत. दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरातील आंदोलनात ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले त्यांना सेवेत घेता येणे शक्य नसल्याचं मोठं वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी केलं आहे.

यावर आता भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane)  यांनी परब यांना खडेबोल सुनावले आहेत. ते म्हणाले, हे 109 कामगार मराठी नाही?? कुठेही पवारांच्या घराचं नुकसान झालेलं नाही मग ही शिक्षा कशासाठी?? किती दिवस पवारांची भांडी घासणार, भानगडी सोडल्या तर काय मिळालं पवारांमुळे महाराष्ट्राला याचा कधी तरी विचार करा आणि ते 109 कामगार कुठे जातील याचाही विचार करा.असं राणे यांनी म्हटले आहे.