Mahesh Tapase | भाजपकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न; महेश तपासे यांचा भाजपवर हल्लाबोल

Mahesh Tapase | अबकी बार ४०० पार चा नारा देणारी भारतीय जनता पार्टी आता रडी चा डाव खेळू लागली आहे अशा तिखट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी भाजपवर निशाणा साधला.

देशातल्या सर्वात जुन्या राजकीय पक्षाचे बँक खाते ऐन निवडणुकीच्या आधी गोठवणे तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक हे लोकशाही विरुद्ध कृत्य भाजप करत असल्याची टीका तपासे यांनी केली. भाजपाला आमची भीती वाटते म्हणूनच ते केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी करतात असा घणाघात तपासे यांनी केला.

भाजपने कितीही आमच्यावर खोटे आरोप दाखल करून विरोधी पक्षांना अडचणी निर्माण करायचा प्रयत्न केला असला तरी इंडिया आघाडीचे सर्व नेते व कार्यकर्ते ह्या जुलमी हुकूमशाहीच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून आपली भूमिका लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मांडतील व देशामध्ये लोकशाही जिवंत राखण्यासाठी पडेल ती किंमत मोजण्याची आमची तयारी असल्याचे तपासे यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आमची लढाई – Muralidhar Mohol

Eknath Shinde | मोदींना औरंगजेबाची उपमा देणं म्हणजे देशद्रोह, एकनाथ शिंदे यांचा संजय राऊत यांच्यावर हल्ला

Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर होताच पुण्यातील कॉंग्रेसमधील जेष्ठ नेता नाराज