Eknath Shinde | मोदींना औरंगजेबाची उपमा देणं म्हणजे देशद्रोह, एकनाथ शिंदे यांचा संजय राऊत यांच्यावर हल्ला

Eknath Shinde |  शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा औरंगजेब म्हणून उल्लेख केला होता. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाला नवी आयाम दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं राम मंदिर बांधण्याचं आणि काश्मीरचं कलम ३७० हटवण्याचं स्वप्न होतं. ते स्वप्न मोदींनी पूर्ण केलं. अशा आदरणीय पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं हा देशाचा अपमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना औरंगजेबाची उपमा देणं हा देशद्रोह आहे”, अशी टीका एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी केली आहे.

“खऱ्या अर्थाने यांची निंदा करावी तेवढी थोडी आहे. कारण औरंगजेब वृत्ती त्यांनी दाखवली. कारण आपल्याला माहिती आहे औरंगजेबाने आपल्या भावाला, वडिलांनाही सोडलं नाही. नातेवाईकांनाही सोडलं नाही. तीच औरंगजेबी वृत्ती ज्यांनी दाखवली ते महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणून त्यांच्याकडून दुसरं काय अपेक्षित करणार?”, असा खोचक सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार जाहीर, पुण्यात धंगेकर तर कोल्हापूरातून या नावाला पसंती

LokSabha Election 2024 | ‘अजितदादा जे बोलले ते पवारसाहेबांचा अभिमान टिकवण्यासाठी आणि आघाडीचा धर्म पाळण्यासाठी होते’

Jitendra Awad | माझ्या डोळ्यात साहेबांसंदर्भात आदर आणि प्रेम असल्याने मनातून अश्रू येतात