राष्ट्रवादी कॉंग्रेस आता गल्लीबोळातला पक्ष ; तुषार भोसलेंनी उडवली राष्ट्रवादीची खिल्ली

 मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. दुसऱ्या बाजूला आयोगानं आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे.  राष्ट्रवादीसह तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष  यांचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे विरोधकांना मात्र राष्ट्रवादीची खिल्ली उडवण्याची संधी मिळाली असल्याचे दिसून येत आहे.भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी या मुद्द्यावरून राष्ट्रवादीला चिमटा काढला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आता गल्लीबोळातला पक्ष राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्यामुळे शरद पवार आता ‘भावी’ पंतप्रधान सोबतच ‘माजी’ राष्ट्रीय अध्यक्ष असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीला डिवचले आहे.