भारतीय क्रिकेटरचा प्रायव्हेट व्हिडिओ लीक, अश्लील गोष्टी बोलताना कॅमेरात झाला कैद!

Shikhar Dhawan Leaked Video: आयपीएल 2023 दरम्यान पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनचा एक प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाला आहे. लीक झालेल्या या व्हिडीओमध्ये धवन त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत काहीतरी बोलत असल्याचे दिसत आहे. आपयीएलमध्ये 9 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात धवनने (Shikhar Dhawan) 99* धावांची शानदार खेळी खेळली. मात्र, या खेळीनंतरही पंजाब किंग्जला विजय मिळवण्यात अपयश आले. आता या सगळ्यात त्याच्या लीक झालेल्या व्हिडिओने खळबळ उडवून दिली आहे.

लीक झालेल्या या व्हिडिओमध्ये धवन एका पार्टीबद्दल बोलत आहे. दिल्लीतील फार्महाऊस पार्टीदरम्यान तो कोणालातरी भेटल्याचे धवन सांगत आहे. भेटलेल्या व्यक्तीला पाहून धवन खूप खूश झाला आणि लवकरच तिच्याशी सोयीस्कर झाला. धवन एका महिलेबद्दल बोलत असल्याचा अंदाज व्हिडिओ पाहणारे नेटकरी लावत आहेत.

दुसरीकडे, धवन गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या घटस्फोटामुळे त्रस्त आहे. अशा परिस्थितीत, ती एक महिला असू शकते, जिच्याशी धवन प्रेमात पडला आहे. धवनने या व्हिडिओमध्ये सांगितले की, ही गोष्ट त्यावेळी घडली जेव्हा त्याच्या आयुष्यात वाईट टप्पा सुरू होता. पहिल्या नजरेत प्रेमात पडल्याबद्दलही तो बोलला. व्हिडिओमध्ये धवन म्हणतोय, “देखा, तो देखते ही रहे गया… सुना, तो सुनते ही रहे गया…”

मात्र, धवनच्या या व्हिडिओबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. वेगवेगळे सोशल मीडिया वापरकर्ते सर्वत्र व्हिडिओ अपलोड करत आहेत. याबाबत स्वत: धवननेही कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही.