पवारांच्या हस्तकाला पुन्हा एकदा अंडासेल दाखविण्याची वेळ आली आहे; भुजबळांवर भोसलेंची टीका 

नाशिक : राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी भाजपकडून (BJP) त्यांच्यावर सडकून टीका होत आहे. यामुळे भुजबळ आणि राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप सुद्धा होत आहे. त्यातच भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी छगन भुजबळ यांच्यावर जहरी टीका केली आहे.

छगन भुजबळांना थेट अंडासेल दाखविण्याची वेळ आल्याचे भोसले यांनी म्हंटले आहे. इतकंच काय तर भुजबळ ही राष्ट्रवादीचे ओवेसी असल्याचा उल्लेख करत तमाम हिंदूंचा अपमान केला आहे. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आल्यामुळे विषारी गरळ ओकून हिंदू समाजात तेढ निर्माण करून दंगली घडविण्याचा कट आहे. आणि म्हणून माफी न मागता आपल्या हिंदू विरोधी भूमिकेवर ठाम राहणाऱ्या पवारांच्या हस्तकाला पुन्हा एकदा अंडासेल दाखविण्याची वेळ आता आली आहे, अशी टीका भुजबळांच्या विरोधात तुषार भोसले यांनी केली आहे.