Ambadas Danve | छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवारीवरुन अंबादास दानवे नाराज, थेट मातोश्रीवर मनधरणीचे प्रयत्न

Ambadas Danve | लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार आहेत. तत्पूर्वी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटातील नेते अंबादास दानवे हे छत्रपती संभाजीनगरमधील लोकसभा उमेदवारीवरुन नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना यंदा छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेसाठी उमेदवारी देण्याची चर्चा आहे. त्यामुळे अंबादास दानवे नाराज आहेत. ते येत्या २-३ दिवसांत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना मातोश्रीवर बोलावले असल्याची बातमी ‘लोकमत’ने दिली आहे. संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अंबादास दानवे इच्छुक आहेत. यापूर्वी देखील त्यांनी तसे बोलवून दाखवले होते. महाविकास आघाडीत संभाजीनगर मतदारसंघ ठाकरे गटाकडेच राहणार असल्याचे देखील जवळपास निश्चित आहे. दरम्यान, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, दानवे यामुळे नाराज असल्याने त्यांना थेट मातोश्रीवर बोलवण्यात आले होते. तसेच तुमची प्रचारासाठी राज्यात गरज असल्याचे त्यांना सांगण्यात आले. सोबतच संजय राऊत यांच्याकडून देखील दानवे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाल्याचं वृत्त आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | निलेशला मीच पक्षात आणलं, त्याला प्रचंड निधीही दिला, पण…. अजित पवारांनी मनातली खदखद बोलून दाखवली

Ajit Pawar | पक्षातून वेगळे झालात, मग शरद पवारांचे फोटो कशाला वापरता? सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना फटकारले

Nitin Gadkari | नागपूर शहरात २४ तास पाणी पुरवठ्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे