मोठी बातमी : पुण्यात अजित पवार आणि उदयनराजे यांच्यात भेट !

पुणे : भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुण्यात भेट झाली आहे. पुण्यातील सर्किट हाऊस येथे हि भेट झाली आहे. या दोन नेत्यांमध्ये भेट झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

उदयनराजे आणि उपमुख्यमंत्री यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना मोठं उधाण आलं आहे. कामानिमित्त भाजप खासदार उदयनराजे भोसले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेट घेतल्याची माहिती उदयनराजे यांनी दिली आहे.

दरम्यान, नुकतेच कोल्हापूर- कागल राष्ट्रीय महामार्गाच्‍या कामासाठी दोन हजार नऊ कोटी, खंबाटकी घाटातील बोगद्यांच्‍या उर्वरित कामांसाठी ४९३ कोटींसह इतर कामासाठी तीन हजार कोटी रुपयांचा निधी देण्‍यात आला असून, प्रतापगड , अजिंक्यतारा, सज्जनगड रोप वेच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्त्वतः मंजुरी देत निधी देण्‍याचे मान्‍य केले आहे. या अनुषंगाने खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्‍लीत मंत्री गडकरी यांची भेट घेत चर्चा केली होती. त्यानंतर आता उदयनराजे यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने सदर भेट कामानिमित्त होती की काही राजकीय खिचडी शिजवण्यासाठी ही गुलदस्त्यात आहे.