‘दारूच्या नशेत बंडाचा केंव्हा सय्यद बंडा झाला कळलेच नाही’

पुणे : साताऱ्यामध्ये बंडातात्या कराडकर यांनी वाईन विक्रीच्या विरोधात आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान त्यांनी सुप्रिया सुळे तसेच पंकजा मुंडे या दारू पितात असा थेट आरोप केला आहे. सुप्रिया सुळे राजकारणात येण्यापूर्वी त्यांचे दारू पिऊन रस्त्यावर पडलेले फोटो तुम्हांला ढीगाने सापडतील असा दावा बंडातात्या कराडकर यांनी केला होता.

साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलत असताना बंडातात्या कराडकर यांनी नेत्यांची मुलं रस्त्यावर दारू पिऊन पडत असल्याचे पुरावे आहेत असं म्हटलं होत.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी बंडातात्या कराडकर यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ‘दारूच्या नशेत बंडाचा केंव्हा सय्यद बंडा झाला कळलेच नाही.’ असा घणाघात अमोल मिटकरी यांनी केला आहे.

दरम्यान, आपल्या रक्तव्याच्या काहीच तासांत बंडातात्या यांना उपरती येऊन त्यांनी आपण हे विधान अनावधाने केले असून त्याबाबदल माफी मागत असल्याचे जाहीर देखील केले. तरी देखील बंडातात्या यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस कमालीची आक्रमक झाली असून बंडातात्यांच्या विरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले तर, राज्यात ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार देखील दाखल केली आहे. तर याउलट पंकजा मुंडे आणि भाजपने बंडातात्या यांच्या वक्तव्यावर सोयीस्कर मौन बाळगले असून साधा निषेध देखील नोंदविलेला दिसत नाही.

यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते रविकांत वरपे यांनी भाजपवर जोरदार घणाघात केला आहे. ‘बंडातात्यांनी सुप्रियाताई आणि पंकजाताई बद्दल विकृत आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ठिकाणी आंदोलने व गुन्हे दाखल केले. पण पंकजा मुंडे यांच्यावरील आरोपावर भाजप गप्प का आहे.? भाजपचे बंड्यातात्याच्या वक्तव्याला समर्थन आहे का ?’ असा सवाल रविकांत वरपे यांनी केला आहे.