हिंदुत्व म्हणजे धोतर नाही, घालावं आणि सोडावं, बाबरी पाडली तेव्हा बिळात होतात – ठाकरे 

 मुंबई – मुंबईत ‘बेस्ट’ बसच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचे (National Common Mobility Card)  लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाले. यानिमित्ताने हिंदुत्व, हनुमान चालिसा अशा विविध मुद्द्यांचा समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला. भाजपावर ( BJP ) सडकून टीका करतांना लवकरच जाहीर सभा घेणार असल्याचं ठाकरे यांनी यावेळी जाहीर केलं.

यावेळी विरोधकांचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ‘हिंदुत्व (Hindutva)  म्हणजे धोतर नाही, घालावं आणि सोडावं, बाबरी पाडली तेव्हा बिळात होतात. मला घंटाधारी हिंदुत्व नको आमचं गदाधारी हिंदुत्व आहे. लवकरच मी सभा घेणार आणि मास्क बाजूला ठेवून मी बोलणार आहे.

हे जे नकली हिंदुत्ववादी आलेत त्यांचा मला समाचार घ्यायचाय. ज्यांच्या पोटात मलमळत आहे, जळजळत आहेत, त्यांनी त्यांच्या राज्यात किती विकास केला हे सांगा, आम्ही त्यांना काडीची किंमत देत नाही..’असं ठाकरे म्हणाले.