परिणीती-राघव चढ्ढाची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल, ‘या’ दिवशी घेणार सातफेरे

Parineeti-Raghav Wedding Card: परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. साखरपुडा झाल्यापासून त्यांच्या लग्नाच्या बातम्यांना उधाण आले आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केले जाते. काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाल्याच्या बातम्या येत होत्या, तर आता परिणीती आणि राघवच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या कार्डमध्ये लिहिले आहे, ‘श्री पीएन चड्ढा जी आणि श्रीमती उषा आणि सचदेवा, अलका आणि सुनील चढ्ढा यांच्या आशीर्वादाने तुम्हाला त्यांचा मुलगा राघव आणि परिणीती यांच्या रिसेप्शन लंचसाठी आमंत्रित केले आहे.’ कार्डवर रिसेप्शनची तारीख ३० सप्टेंबर, तर स्थळ ताज चंदीगड असे लिहिले आहे.

या दिवशी लग्न होईल
राघव चढ्ढा आणि परिणीतीच्या लग्नाचे कार्ड व्हायरल झाल्याबद्दल परिणीती चोप्रा किंवा राघव चड्ढा यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. हे दोघे राजस्थानमध्ये लग्न करणार असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. राघव आणि परिणीती २३ आणि २४ सप्टेंबरला पंजाबी रितीरिवाजानुसार लग्न करणार आहेत.

दिल्लीत दोघांचं लग्न होणार!
१३ मे रोजी या जोडप्याचा साखरपुडा झाला. नवी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये त्यांच्या एंगेजमेंटचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर राघव आणि परिणिती उदयपूरमधील लग्नाच्या ठिकाणी जाताना दिसले. याशिवाय राघव आणि परिणीती अनेकदा एअरपोर्टवर स्पॉट झाले होते.