यूकेमध्ये रिपब्लिक टीव्ही दाखवणाऱ्या फर्मला  कोर्टाने 37,500 पौंड  दंड ठोठावला 

लंडन – अर्णब गोस्वामीचा (Arnab Goswami) युनायटेड किंगडम (यूके) मध्ये रिपब्लिक टीव्ही (Republic TV) दाखवणाऱ्या फर्मला लंडनच्या कोर्टाने 37,500 पौंड (सुमारे 35.42 लाख) दंड (Penalty) ठोठावला आहे. यूकेमध्ये रिपब्लिक टीव्हीचे प्रसारण करण्याचा परवाना असलेल्या वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्क लिमिटेड (Worldview Media Network Limited) नावाच्या कंपनीला हा दंड ठोठावण्यात आला आहे. एका ब्रिटिश व्यावसायिकाची बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयाने ही कारवाई केली आहे.

22 जुलै 2020 रोजी रिपब्लिक टीव्ही शोमध्ये, पाकिस्तानी वंशाच्या ब्रिटीश व्यापारी आयल मुसरतला (Ayal Musrat) ISI कठपुतळी संबोधण्यात आले. त्याच प्रकरणात, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती, राणीच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की “कार्यक्रमात कोणत्या प्रकारच्या दाव्याचा कोणताही ठोस पुरावा नाही. तर अशा आरोपांमुळे प्रकरणाच्या दावेदाराच्या प्रतिष्ठेला गंभीर नुकसान होण्याची शक्यता होती.या प्रकरणातील दावेदार, आयल मुसरत हा पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश व्यापारी असून, त्याला शोमध्ये ISI कठपुतळी म्हणून संबोधण्यात आले होते. यासोबतच त्याचे छायाचित्रही विविध कॅप्शनसह प्रसारित करण्यात आले.

दरम्यान, या सुनावणीत रिपब्लिक टीव्ही दाखवणारी युनायटेड किंगडम (यूके) शो फर्म वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्क लिमिटेडने कायदेशीर कारवाईत भाग घेतला नाही. वर्ल्डव्यू मीडियाकडे यूकेमध्ये रिपब्लिक टीव्हीचे प्रसारण करण्यासाठी यूके ऑफिस ऑफ कम्युनिकेशन (ऑफकॉम) कडून परवाना आहे.