एकनाथ शिंदेंना आमदार केल्याचा मला पश्चाताप – राऊत

Mumbai – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटात सध्या बराच संघर्ष सुरू असून मोठ्याप्रमाणात शिवसैनिक हे द्विधा मनस्थितीत आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांच्या विचारांच्या वारसदाराला साथ द्यावी की रक्ताच्या वारसदाराला मदत करावी असा यक्षप्रश्न सध्या सेनेच्या कार्यकर्त्यांच्या पुढे आहे. अनेकांनी विनंती करून देखील उद्धव ठाकरे हे कॉंग्रेस – राष्ट्रवादीची (Congress – Nationalist Congress) साथ सोडायला तयार नसल्याने नेते मंडळी शिवसेनेला राम राम ठोकत आहेत असं चित्र सध्या दिसत आहे.

दरम्यान, या बंडामुळे शिवसेनेची चांगलीच नाचक्की झाली असून खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी आता मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. ठाणे शहराचा संपर्कप्रमुख असताना मी मध्यस्थी केल्यानेच बाळासाहेबांनी  एकनाथ शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. पण मला आज त्याचा पश्चाताप होत आहे.असं राऊत यांनी म्हटले आहे.

माझ्या हातून आयुष्यातील मोठं पाप झालं आहे. मी शिफारस केली नसती तर आमदारकी मिळाली असती का ? हे त्यांनी आई-वडिलांची शपथ घेऊन सांगावं,” असं आव्हान विनायक राऊत यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) एकटं पाडण्याचा कुटील डाव ४० अलिबाबा चोरांच्या माध्यमातून भाजपा (BJP) खेळत असेल, तर अलिबाबाची गुहा पोखरुन शिवसैनिक (Shivsainik) भगवा झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे.