मला युक्रेनमध्ये जाऊ द्या; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची मोदींकडे मागणी

माढा – सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असणाऱ्या युद्धाकडे अवघ्या जगाचे लक्ष आहे.रशियाने आक्रमक भूमिका घेतल्याने युक्रेन सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. यातच भारतातून युक्रेनमध्ये गेलेले अनेक नागरिक तसेच विद्यार्थी देखील अडकून पडले आहेत. मोदी सरकार देखील या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. यातच आता माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्र सरकारकडे एक लक्ष्यवेधी मागणी केली आहे.

युक्रेन व रशियात सध्या युद्धजन्य परिस्थिती असून येथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थी आणि नागरीकांना सुरक्षित परत आपल्या देशात आणण्यासाठी पाठवल्या जाणाऱ्या शिष्टमंडळात सदस्य म्हणून जाण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी पाठवल्या जाणार्‍या शिष्टमंडळाचा सदस्य म्हणून मला काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी नाईक निंबाळकर यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

सर्व भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी पाठवल्या जाणार्‍या शिष्टमंडळाचा सदस्य म्हणून माझी इच्छा आहे. मी घटनास्थळी पोहोचून तेथील शेवटचा भारतीय सुरक्षित मायदेशी परतेपर्यंत देशाची सेवा करण्याची माझी इच्छा आहे. माझ्यासाठी देश प्रथम आहे, देश पुन्हा नाही. तरी भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी पाठवल्या जाणार्‍या शिष्टमंडळाचा सदस्य म्हणून मला काम करण्याची संधी द्यावी अशी विनंती केली आहे.