शिंदे-फडणवीसांच्या हातून सन्मान नको, उल्का महाजन यांनी नाकारला पुरस्कार

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis) यांचे सरकार लोकशाहीचा मान न राखता सत्तेत आलें आहे. भ्रष्टाचाराच्या आधारे सत्तेल आलेल्या शिंदे-फडणवीस यांच्या हातून सन्मान स्वीकारणे माझ्या सदसद्विवेकबुद्धीला पटणारे नाही, असे स्पष्ट करत सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन (Social activist Ulka Mahajan) यांनी ‘एबीपी माझा’ वाहिनीकडून देण्यात येणारा ‘माझा सन्मान'(Majha Sanman Puraskar)  हा पुरस्कार नाकारला आहे.

‘माझा सन्मान’ हा सोहळा 1 जुलै रोजी होणार होता. मात्र राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तो पुढे ढकलण्यात आला. 3 ऑगस्ट रोजी राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. परंतु ज्या पद्धतीने मतदारांचा, लोकशाहीचा व संविधानाचा मान न राखता हे सरकार भ्रष्टाचाराच्या आधारे सत्तेवर आले आहे.

त्या पार्श्वभूमीवर अशा व्यक्तींच्या हस्ते (ते संविधानिक पदावर असले तरीही) सन्मान स्वीकारणे माझ्या सदसद्विवेक बुद्धीला पटणारे नाही. म्हणून सदर सन्मान मी नम्रपणे नाकारत असल्याचे उल्का महाजन यांनी म्हटले आहे. दरम्यान, आता या मुद्द्यावरून काहीजण महाजन यांना ट्रोल करत आहेत तर काहीजण त्यांचे कौतुक सुद्धा करत आहेत.