ओ हो हो… कमाल झाली; नागालँडमध्ये रामदास आठवलेंच्या आरपीआय पक्षालाही मिळाल्या ‘इतक्या’ जागा

नवी दिल्ली – नागालँडमधून (Nagaland) येणाऱ्या ट्रेंडमध्ये भाजप आघाडीने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. भाजप आघाडी 60 पैकी 49 जागांवर आघाडीवर असून काँग्रेस केवळ 3 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय एनपीएफ ७ जागांवर तर इतर एका जागेवर आघाडीवर आहेत. अशा स्थितीत नागालँडमध्ये भाजप आघाडी स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन करेल, असे मानले जात आहे. नागालँडमध्ये सध्या राष्ट्रवादी डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) आणि भाजपा (BJP) यांचे युतीचे सरकार आहे. हे सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असे ट्रेंडवरून दिसते.

दरम्यान, नागालँडलमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या रिपब्लिकन पक्ष पार्टीचा उमेदवार २ जागांवर निवडून आले आहेत. तर, एनडीपीपीचा उमेदवार १ जागेवर निवडून आला आहे. भाजपाचे उमेदवार २ जागेवर निवडून आले असून, १२ जागांवर आघाडीवर आहेत.