हॉटेलमध्ये सापडला तरुणीचा मृतदेह, चार वर्षांपासून करण्यात आली होती खोली बुक

नवी दिल्ली- राजधानी दिल्लीच्या दक्षिण पश्चिम भागात हत्येची खळबळजनक घटना घडली आहे. महिपालपूर परिसरातील एका हॉटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आला.  27 फेब्रुवारी रोजी व्हीके दक्षिण पोलिसांना महिपालपूर येथील लक रेसिडेन्सी हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह असल्याची माहिती  समोर येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हॉटेलच्या खोलीत घुसून या तरुणीची  हत्या करण्यात आली आहे. शिवम नावाच्या तिच्या एका मित्राने ही हत्या केली आणि त्याची हत्या करून तेथून पळ काढल्याचा आरोप आहे. हत्येची माहिती मिळताच डीसीपी दक्षिण पश्चिम घटनास्थळी पोहोचले. गाझियाबादचा रहिवासी शिवम चौहान याने गेल्या 4 वर्षांपासून हॉटेलमध्ये रूम बुक केल्याचे तपासात समोर आले आहे.

दरम्यान, हॉटेलमध्ये झडती घेत असताना पोलिसांना दारूच्या बाटल्याही सापडल्या आहेत. गुन्हे शाखेच्या तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी सफदरजंग रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू असून पथके तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीची ओळख पटली असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.