वीजतोडणीस येणाऱ्या अधिकाऱ्यांना ठोकुन काढु; स्वाभिमानीचा इशारा

पंढरपूर – आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतिने वाखरी ता.पंढरपूर येथे विविध मागण्यांबाबत रास्तारोको आंदोलन करण्यात आले. गेल्या आठवडाभरापासून महावितरण विरोधात स्वाभिमानीचे प्रमुख राजु शेट्टी हे कोल्हापुरातील महावितरण कार्यालयावर धरणे आंदोलनास बसले आहेत.आठवडाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनास आता तीव्र स्वरूप येताना दिसत आहे.

याचाच एक भाग म्हणून आज वाखरी ता.पंढरपूर येथे आंदोलन करण्यात आले यावेळेस बोलताना स्वाभिमानीचे युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल म्हणाले, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी,चुकीची बिले दुरूस्त करावीत व सुरू असलेली वीज तोडणी ताबडतोब थांबवावी या मागण्यांसाठी स्वाभिमानी कडुन हा रास्तारोको सुरू आहे,आमच्या मागण्यांबाबत सरकारने गांभीर्यपूर्वक निर्णय न घेतल्यास आज रस्ते रोखले आहेत, उद्या वीजतोडणीस येणाऱ्या अधिकाऱ्यांना ठोकुन काढु असा इशारा देखील यावेळेस बागल यांनी दिला

यावेळेस स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील,जि.प सदस्य नानासाहेब गोसावी, गुलाब पोरे,साहेबराव नागणे, संग्राम गायकवाड, शहाजहान शेख,सचिन आटकळे,मनोज गावंधरे यांसह शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते,महावितरणचे वतिने अधिकारी प्रकाश पाटील यांनी निवेदन स्वीकारले.