देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं; अमृता फडणवीसांचं वक्तव्य

मुंबई : राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून, शिवसेनेच्या (Shivsena) नेतृत्वाला आव्हान देऊन आज एकनाथ शिंदे सरकारने आपलं बहुमत सिद्ध केलं. अनेक अडचणी समोर असतानाही एकनाथ शिंदेंनी ही किमया करुन दाखवली.   एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारचा नुकताच शपथविधी झाला. तर विधानसभेतील दोन दिवसीय विशेष अधिवेशनात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस सरकारनं बहुमतापेक्षा मोठा आकडा गाठून आपलं सरकार मजूबत असल्याचं दाखवून दिलंय.

दरम्यान, हे सरकार नेमके कसे अस्तित्वात आले याबाबत आता माहिती समोर येत येत असताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत अमृता फडणवीस Amrita Fadnavis) यांनी माहिती दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

अमृता फडणवीस म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस रात्री वेश बदलून शिंदेना भेटायला जायचे. असा गौप्यस्फोट अमृता फडणवीस यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, मला माहित होतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाही, तसेच कोणतंही पद स्वीकरणार नाही, याबाबत मला गर्व वाटत होता. की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद दिले, तसेच मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना कोणताही फरक पडणार नव्हता. असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.

देवेंद्रजींना कायम महाराष्ट्राची सेवा करायला आवडतं ते कायम तेच काम करत आले आहेत. याआधी ते आमदार असताना, त्यानंतर मुख्यमंत्री असताना, विरोधी पक्षनेते असताना त्यांनी कायम जनतेच्या प्रश्नांसाठी लढा दिला. आता ते सत्तेत आलेत तर ते आताही जनतेच्या सेवेसाठी कायम कार्यरत असतील याचा मला विश्वास आहे. एकनाथ शिंदेदेखील 24 तास जनतेच्या सेवेसाठी तयार असतात. त्यामुळे हे दोघे मिळून जरूर महाराष्ट्र हिताची कामं करतील, याची मला खात्री आहे”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.