“माझ्या नवऱ्याने किंवा त्याच्या कुटुंबाने मला धर्म बदलण्यासाठी..”, अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे लक्षवेधी विधान

मराठी सिनेइंडस्ट्रीसह बॉलीवूडही गाजवणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) ही नुकतीच झी मराठीच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात आली होती. या कार्यक्रमात अवधुत गुप्तेने (Avdhut Gupte) उर्मिला मातोंडकरला मनोरंजन सृष्टीपासून ते राजकारण आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारले. उर्मिला मातोंडकरनेही सर्व प्रश्नांची बेधडक उत्तरे दिली. यादरम्यान आपल्या पती आणि त्याच्या कुटुंबियांबद्दल उर्मिला मातोंडकरने लक्षवेधी बाब सांगितली.

अवधुत गुप्तेने उर्मिलाला पतीकडून कधी लग्नानंतर धर्म बदलण्याबाबत सांगण्यात आले का? असे विचारले असता उर्मिला म्हणाली, माझ्या नवऱ्याने किंवा त्याच्या कुटुंबाने मला कधीही धर्म बदलण्यासाठी सांगितलं नाही. आम्ही दोघंही एकमेकांच्या धर्माचा कायमच आदर करतो. मी नेहमीच हिंदू होते आणि असेन. मी माझा धर्म बदलला नाही.