कमाल.. लाजवाब..! भारताचा पाकिस्तानवर एकहाती विजय, विश्वचषकातील विजयाची हॅट्रिकही केली पूर्ण

IND vs PAK World Cup Highlights: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) १ लाख ३० हजार लोकांपुढे पुन्हा एकदा भारतीय संघाने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला वनडे विश्वचषकाच्या थरारक सामन्यात पराभूत केले. भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा विजयाचा खरा अर्थाने शिल्पकार राहिला. नाणेफेकीनंतर गोलंदाजीचा चपळ निर्णय घेण्यापासून ते धुव्वादार फलंदाजीपर्यंत त्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारताने ७ विकेट्स राखून हा सामना खिशात घातला. तसेच स्पर्धेतील विजयाची हॅट्रिकही पूर्ण केली.

पाकिस्तानच्या १९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून हिटमॅन रोहितने(Rohit Sharma) ८६ धावांची भारी खेळी केली. ६३ चेंडूत ६ लांबलचक षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने त्याने ही खेळी साकारली. तसेच श्रेयस अय्यरनेही (नाबाद ५३ धावा) शेवटी चिवट झुंज देत संघाच्या विजयात बरोबरोचे योगदान दिले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानकडून एकटा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) अर्धशतक पूर्ण करू शकला. ५८ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने त्याने संघासाठी महत्त्वाच्या ५० धावा केल्या. तर यष्टीरक्षक मोहम्मद रिझवाननेही ४९ धावांची खेळी केली. शिवाय सलामी जोडी इमाम-उल-हक (३६ धावा) आणि अब्दुल्ला शफिक (२० धावा) यांनीही धावफलक हालता ठेवला. मात्र इतर फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांपुढे अक्षरश: नांग्या टाकल्या. पाकिस्तानचा संघ ४२.५ षटकातच १९१ धावांवर सर्वबाद झाला.

या डावात भारताकडून वेगवान गोलंदाज बुमराह, सिराज, अष्टपैलू हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

महत्वाच्या बातम्या-

…तर मनोज जरांगेंपेक्षा मोठं आंदोलन उभं करू; ओबीसी महासंघाचा इशारा

मी अजितदादांना विनंती करतो छगन भुजबळांना जरा समज द्या,नाहीतर ते – जरांगे पाटील

मराठ्यांच्या ढाण्या वाघाची डरकाळी; मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला ‘हा’ इशारा