मोठी बातमी : उत्पल पर्रिकर पणजीतुन आघाडीवर, ‘आरएसएस’चा पाठीवर हात ?

पणजी : उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज होत आहे. याबरोबरच काही पोटनिवडणुकांचीही मतमोजणी आज होणार असून मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिद्धू, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.

गोवा निवडणुकीत सर्वात जास्त चर्चेत असलेली जागा म्हणजे पणजी विधानसभा मतदारसंघ. भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्त्पल पर्रीकर यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र सर्वच राजकीय पंडितांच्या मते उत्त्पल पर्रीकर हे पिछडीवर राहणार असल्याचे बोलले जात होते. मात्र सुरवातीच्या कालांनुसार उत्त्पल पर्रीकर यांनी आश्चर्यकारक आघाडी घेतली आहे. उत्पल पर्रीकर यांच्या या आघाडीच्या मागे आरएसएसचा मोठा हात असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, गोव्यामध्ये सत्ता स्थापनेचे मांडे निकालाआधीच खाणारे, स्वबळाच्या अतिआत्मविश्वासावर वावरणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे एक्झिट पोलनंतर आणि सुरवातीच्या सूर बदलले आहेत. आता सत्ता स्थापनेसाठी आम्ही छोट्या पक्षांना सोबत घेऊ असा सूर येथे भाजप नेते आळवतायत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर पाच राज्यांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल समोर आले. त्यात गोव्यात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नाही. या अंदाजानंतर भाजप नेत्यांनी आपले सूर बदलल्याचे समोर येतेय.