IND vs NZ: रोहित शर्मा बनला ‘गजनी’, टीम इंडियाचा कॅप्टन विसरला नाणेफेक जिंकून काय करायचे?

IND vs NZ:  टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Team India captain Rohit Sharma) विसरण्याच्या सवयीबद्दल सर्वांनाच माहिती आहे. कधी तो फ्लाइटमध्ये iPod विसरतो, तर कधी हॉटेलमध्ये अंगठी. रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान रोहित शर्माची विसरण्याची सवय थेट दिसली.

रोहित शर्मा नाणेफेकीनंतर काय निर्णय घ्यायचा ते तो विसरला. 20 सेकंद विचार केल्यानंतर त्याने रवी शास्त्रींना सांगितले की मी मैदानात प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नाणेफेकीचा व्हिडिओ ट्विट केला आहे.(IND vs NZ: Rohit Sharma becomes ‘Ghajni’, Team India captain forgets what to do after winning toss?)

नाणेफेक जिंकल्यानंतर रवी शास्त्रींनी रोहित शर्माला विचारले की, तू काय करशील? रोहित शर्मा डोकं खाजवत बराच वेळ गप्प राहिला. यावेळी न्यूझीलंडचा टॉम लॅथम आणि सामनाधिकारी जवागल श्रीनाथ हसताना दिसले. भारतीय कर्णधाराने अखेर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

रायपूर एकदिवसीय सामन्यात नाणेफेक झाल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, “आम्हाला काय करायचे होते ते मी विसरलो, नाणेफेकीच्या निर्णयाबाबत संघाशी बरीच चर्चा झाली. कठीण परिस्थितीत स्वतःला आव्हान द्यायचे आहे, पण आम्ही प्रथम गोलंदाजी करू.