एवढ्या मोठ्या लेखकाने असं… नेमाडेंच्या औरंगजेबावरील वक्तव्यावर वैभव मांगलेंचा थेट प्रश्न

प्रसिद्ध लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांच्या औरंगजेबाबद्दलच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भालचंद्र नेमाडे यांनी औरंगजेब हा हिंदुद्वेष्टा नव्हता. औरंगजेबाच्या काळात हिंदू सरदार वाढले होते. औरंगजेबाला इतिहासकारांनी हिंदूद्वेष्टा ठरवले आहे, असा दावा केला आहे. ‘मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालया’तर्फे मुंबईतील दादरमध्ये शतकोत्तरी रौप्य महोत्सवी सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते.

साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर एकच वादळ उठलं आहे. त्यात भालचंद्र नेमाडे यांच्या त्या वक्तव्याबद्दल लोकप्रिय अभिनेते वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांनीही एक पोस्ट शेअर करत आक्षेप घेतला आहे.

वैभव यांनी पोस्ट करत लिहिलं, ‘एवढ्या मोठ्या लेखकाने अशी दैनंदिनीशी निगडित नसलेली किंवा त्यांनी रोजच्या कार्यक्रमात सुतरामही फरक पडणार नाही अशी विधानं का करावीत?’