राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर महाराष्ट्रातील जनता पेटून उठेल – जयंत पाटील 

मुंबई – राज्यात कायदा सुव्यवस्था (Law And Order) आहे की नाही असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे. कारण विरोधी पक्षातील नेत्यांवर सत्ताधारी मंडळींकडून हल्ले करण्यात येत असल्याचे वारंवार समोर येत आहे. नुकताच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (MP Navneet Rana and MLA Ravi Rana) यांना पोलिसांनी  अटक  केल्यानंतर  त्यांना भेटायला आलेले भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी (Shivsainik) हल्ला केला आहे.

त्याआधी भाजप नेते मोहित कंभोज (Mohit Kambhoj)  यांच्यावर देखील शिवसैनिकांनी हल्ला केला होता. याशिवाय आमदार गोपीचंद पडळकर(gopichand padalkar)  यांच्यावर सुद्धा प्राणघातक हल्ला झाला होता सोबतच  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devandra fadanvis) यांच्या गाडीवर सुद्धा चप्पलफेक करण्यात आली होती. या सर्व घडामोडी घडत असताना राष्ट्रपती राजवट लावली जावी अशी मागणी केवळ विरोधकच नव्हे तर सामान्य जनता देखील करू लागली आहे.

दुसऱ्या बाजूला राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरून राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. राष्ट्रपती राजवट लावली तर राज्यातील जनता पेटून उठेल, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे.  विरोधकांचे आता सर्व उपाय संपले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न दिसत आहे. परंतु, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर महाराष्ट्रातील जनता पेटून उठेल असे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ज्यांच्या पुढाकाराने राज्यात हे चालू आहे त्यांच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरेल असा इशाराही जयंत पाटील यांनी यावेळी दिला आहे.