औरंगाबाद आणि उस्मानाबादची नावे बदलण्याच्या निर्णयाला शिंदे सरकारने स्थगिती दिली

Mumbai – महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन ठिकाणांची नावे बदलण्याच्या मागील उद्धव ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयाला शिंदे-फडणवीस सरकारने तूर्त स्थगिती दिली आहे. शिंदे फडणवीस सरकार हा प्रस्ताव नव्याने मंत्रिमंडळासमोर ठेवणार आहे.

ज्यावेळी उद्धव ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला, त्या वेळी राज्यपालांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितले होते.  यामुळे  या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात होते.यामुळेच या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतलेले सर्व निर्णय रोखण्याचे आदेश नव्या सरकारने दिले असून, मुख्यमंत्री या सर्व निर्णयांचा फेरआढावा घेणार आहेत.

दरम्यान, ठाकरे सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण दिवंगत डीबी पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्यात आले. त्याचवेळी औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती.