रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता ? गंगाखेडच्या नागरिकांना पडलाय प्रश्न

गंगाखेड / विनायक आंधळे : गंगाखेड ( Gangakhed ) शहरातील सर्वाधिक रहदारीचा मुख्य बाजारपेठेतील रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट (The condition of the road is very bad) झाली आहे. जून महिन्यातील पावसानंतर अनेक ठिकाणी खड्डे (potholes) पडले होते. त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या दोन तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसानंतर नागरिकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागतेय. नगरपालिकेने ( Municipality ) लवकरात लवकर हे खड्डे बुजवावे अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.

गंगाखेड शहरातील श्रीराम चौक ते पोलीस स्टेशन (From Shriram Chowk to Police Station) दरम्यान मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर सर्व व्यापारी दुकाने असून मोठी बाजारपेठ असल्याने वाहने, नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ – मोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना कसरत करावी लागते. पावसानंतर या खड्ड्यांत मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने वाहनांमुळे उडालेले पाणी रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांच्या अंगावर उडत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे.