Nitish Kumar यांची आज अग्निपरीक्षा; बहुमत चाचणीआधी धाकधूक वाढली

बिहारमध्ये नितिश कुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत बहुमत चाचणीला (Nitish Kumar) सामोरं जाणार आहे. 243 विधानसभा सदस्य असलेल्या विधानसभेत आपण बहुमत सिध्द करणार असा विश्वास या गटानं व्यक्त केला तर दुसरीकडे, विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दल आपल्या रणनीतीवर ठाम आहे.

आरजेडीचे सदस्य असलेले विद्यमान सभापती अवध बिहारी चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. यामुळे चौधरी यांनी एनडीए च्या बहुमत चाचणीपुर्वी भाजपा आणि जेडीयू सदस्यांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला सामोरं जावं लागेल.

243 सदस्यांच्या बिहार विधानसभेत NDA ला भाजप, जनता दल (U), हिंदुस्थानी अवाम मोर्चा आणि एक अपक्ष अशा 128 आमदारांचा पाठिंबा आहे. तर राजद आणि काँग्रेसयुतीला 114 आमदारांचा पाठिंबा आहे. बहुमत सिध्द करण्यासाठी 122 चा आकडा पार करण्याची गरज आहे.

महत्वाच्या बातम्या : 

महाराष्ट्रातील सरकार जनतेने नाही तर ED, CBI ने निवडून दिलेले: रमेश चेन्नीथला

निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला CAA ची आठवण, नेहमीप्रमाणे CAA हाही ‘चुनावी जुमलाच’

‘ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांच्या…’, पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया