पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे नेहमी विव विविध कारणांसाठी चर्चेत येत असतात. आता पुन्हा एकदा कोळे हे चर्चेत आले आहेत ते यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे. डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे विमानतळावर असलेल्या पेन्टिंग्जवरून त्यांनी ट्वीट केले आहे. या ट्वीटमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे विमानतळावर फोटो, सेल्फी घेतला. त्यांनी पुणे विमानतळ प्राधिकरणाला पेशवेकालीन पेन्टिंग्जवरून प्रश्न उपस्थित केले आहेत. या ट्वीटवर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया आता येवू लागल्या आहेत.
तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढू तुळापूर देखील आहे याचा पुणे एअरपोर्ट आॅथॅरिटीला विसर पडला की काय? २/२@aaipunairport @MoCA_GoI @JM_Scindia @Gen_VKSingh@MPGirishBapat @supriya_sule
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 3, 2021
डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लालमहालसुद्धा आहे, सिंहगडही आहे आणि याच जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी, तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढू तुळापूर देखील आहे याचा पुणे एअरपोर्ट आॅथॅरिटीला विसर पडला की काय? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.