Video : उर्फी जावेद घरात कसले कपडे घालते? अभिनेत्रीचं उत्तर ऐकल्यावर भल्याभल्यांना फुटेल घाम

भारतात उर्फी जावेद (Urfi Javed) हे नाव कोणाला माहिती नाही असा व्यक्ती शोधून सापडणार नाही. आपल्या अतरंगी कपड्यांमुळे उर्फी नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. तर कधी कपड्यांबरोबरच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे ती चर्चेत येत असते. आता उर्फीने ती घरी असल्यावर कोणते कपडे घालते या प्रश्नाचे बिनधास्त उत्तर देत सर्वांनाच घाम फोडला आहे.

बिग बॉस फेम उर्फी जावेद ही कपड्यांवर विविध प्रयोग करत असते. कधी सायकलच्या चैनपासून, कधी दगडांपासून, कधी कचऱ्याच्या पिशवीपासून तर कधी चिकटपट्टीपासून तिने ड्रेस बनवले आहेत. तिचे हे ड्रेस सहसा शॉर्ट आणि मॉडर्न असतात, ज्यामध्ये ती अंगप्रदर्शन करते. परंतु उर्फी जावेद घरी असताना कसले कपडे घालते, हा प्रश्न अनेकांना पडला असावा. आता उर्फीने स्वत:च या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

Elelo ऍपला दिलेल्या मुलाखतीत उर्फीला चाहत्यांच्या मनातले प्रश्न विचारण्यात आले. एका चाहत्याने तिला प्रश्न विचारला की, तू घरी काय घालतेस? यावर उर्फी म्हणाली, काहीच नाही. उर्फीचे हे उत्तर ऐकून काही मिनिटांसाठी मुलाखतदारालाही घाम फुटला. या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

https://twitter.com/HasnaZarooriHai/status/1661749502771101698?s=20