किमान लोकसभा निवडणुकीपर्यंत शरद पवारांनी राजकारणात राहावं – संजय राऊत 

Sharad Pawar Resigns: ‘लोक माझे सांगाती’ याच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा (Sharad Pawar resigned from the post of party president)  देत असल्याची घोषणा केली होती. शरद पवारांनी त्यावेळी चेंडू राष्ट्रवादीच्या सदस्य समितीच्या कोर्टात टोलावला होता.यानंतर आता राष्ट्रवादीच्याकोअर कमिटीने शरद पवारांनी घेतलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय फेटाळला आहे.त्यामुळे शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष राहणार असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे.

दरम्यान, शरद पवार विरोधी पक्षाच्या आघाडीचे महत्वाचे स्तंभ आहेत. शरद पवारांचा राजीनामा हा व्यक्तीगत विषय असू शकत नाही. आपण राजकारणात असून, आपलं विरोधी पक्षांचं राजकारण आहे. आपली लढाई ही देशातील हुकूमशाहीविरोधात आहे. त्यामुळे लोकसभेची निवडणूक होईपर्यंत शरद पवारांनी पक्षाचं नेतृत्व करावं, अशी अपेक्षा शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

आपली लढाई ही देशातील हुकूमशाहीविरोधात आहे. अशावेळी आपले स्तंभ उभे केले पाहिजेत. आपला पक्ष टिकवता आला पाहिजे. शरद पवारांच्या नावाभोवती राष्ट्रवादी पक्ष उभा आहे, असे संजय राऊतांनी म्हटलं.