Vijay Shivatare | विजय शिवतारेंचा सूर बदलला; म्हणाले, “सुनेत्रा वहिनींना आम्ही बहुमताने निवडून आणू”

Vijay Shivatare | कालपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरोधात गरळ ओकणारे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या उमेदवाराला पाडण्यासाठी प्रयत्नशील असणारे विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांचा आज सूर बदलला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची भेट घेत शिवतारेंनी आपला बारामती लोकसभा लढवण्याचा निर्णय मागे घेतला. त्यानंतर आता बारामतीतून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना बहुमताने निवडणूक आणू अशी घोषणा शिवतारेंनी केली आहे.

‘दीड लाख मतं ही महायुतीच्या उमेदवाराला झाली पाहिजेत, मुख्यमंत्र्याशी झालेल्या बैठकीत अशा सर्वांना सुचना देण्यात आल्या. अजित दादांनी स्पष्टपणे सांगितलं की पंतप्रधान आपल्याला नरेंद्र मोदींना करायचं आमचं सगळ्यांचं ध्येय आहे. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये एक मत देखील जाता कामा नये असं काम करायचं आणि हा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आणायचा’, असं ते म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल