Archana Patil Chakurkar | काँग्रेसला धक्का ! शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील चाकूरकर यांचा भाजपात प्रवेश

Archana Patil Chakurkar Joins BJP | लोकसभा निवडणुकीच्या तारखा अगदी जवळ आल्या आहेत. राजकीय पक्षांमध्येही पक्षांतराची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्या अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी शुक्रवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर अर्चना पाटील (Archana Patil Chakurkar) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली होती.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अर्चना पाटील म्हणाल्या की, माझ्या राजकीय प्रवासाची ही नवी इनिंग आहे. पक्षाने माझ्यावर जी काही जबाबदारी दिली आहे, ती मी पूर्ण निष्ठेने पार पाडेन. पाच वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या अटकळींबाबत त्या म्हणाल्या की, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे मी तेव्हा तसे करू शकले नाही. मला कोणत्याही पदाची इच्छा नाही. आता देशहितासाठी भाजपसोबत मिळून देशाच्या विकासासाठी काम करेन.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रवेशामुळे वेगळीच गणित मांडले जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीतही चाकुरकरांच्या प्रवेशामुळे सोलापूर ,धाराशिव ,लातूर ,नांदेड या चार लोकसभा निवडणुकीत याचा फायदा होईल अशी चर्चा भाजपच्या गोटात आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल