मटण खाऊन देवदर्शन केल्याचा विजय शिवतारेंचा आरोप; सुप्रिया सुळे म्हणाल्या,…

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी मटण खाऊन देवदर्शन घेतल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केला आहे. शिवतारे यांनी फेसबूकवर एक व्हिडीओ शेअर करत हा आरोप केला. दरम्यान, या आरोपानंतर आता पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सुप्रिया सुळे यांच्या या कृतीमुळे भावना दुखावल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच सुप्रिया सुळे यांचा मटण खातानाचा व्हिडीओही शेअर केला आहे. तसेच देवदर्शन घेतानाचे फोटोही शेअर केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन देवदर्शन घेतल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केला होता. यासंदर्भात विचारलं असता, “मी याबाबत काहीही बोलू शकत नाही. कारण याबाबत मला काहीही माहिती नाही. आज महागाई, बेरोजगारी आणि पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हे मुद्दे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत”, असे त्या म्हणाल्या.