‘तो मला बंद खोलीत नको तिथे स्पर्श करत होता, मी शरीरसंबंधाना नकार देताच त्याने….’

Vinod Kashyap – दिल्लीतून अतिशय घृणास्पद असा प्रकार समोर आला आहे. स्वतः आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणाऱ्या विनोद कश्यप या नराधमाचा प्रताप आता जनतेसमोर आला असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या बाबाचा सत्संगाचा दरबार नेहमीच चर्चेचा विषय असायचा, जिथे स्वतःला देव म्हणणारा हा बाबा बसायचा. याच दिल्लीच्या स्वयंघोषित बाबाची अत्यंत भितीदायक कहाणी आता समोर आली आहे.

विनोद कश्यप नावाच्या बाबाने दिल्लीतील द्वारका येथील एका दुमजली घरात आपला दरबार सजवला होता. तो लोकांचे प्रश्न सोडवू शकतो असा दावा करत असे. तो स्वतःला देवाचा अवतार समजत असे. माझ्यावर देवाचा आशीर्वाद आहे त्यामुळे तो लोकांच्या प्रत्येक समस्या सोडवू शकतो, असा दावा तो करायचा.

बाबाचे बस्तान बसले तेव्हा एका आठवड्यात, 400 पेक्षा जास्त भाविक विनोद कश्यप यांच्या दुमजली इमारतीत येऊ लागले, ज्याला ते त्यांचा आश्रम म्हणतात. पण हा बाबा गुरुसेवेच्या नावाखाली तो महिलांवर बलात्कार करत होता. बाहेर सत्संग असेल तर आत खोलीत बाबांची रास लीला चालायची. दिल्लीत राहणाऱ्या दोन महिलांनी या बाबावर गुन्हा दाखल केला आहे. कुटुंबाच्या सुखासाठी या बाबाला भेटण्यासाठी एक महिला आपल्या पतीसोबत आली होती. महिलेला 3 मुलेही आहेत. बाबा म्हणाले की, त्यांचे कुटुंब मोठ्या संकटात आहे. पूजेच्या नावाखाली बाबाने त्याच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी सुरू केली.

जेव्हा या लोकांनी पैसे देण्यास नकार दिला तेव्हा गुरूची सेवा करण्याच्या नावाखाली बाबांनी महिलेला एकटे बोलावले. महिलेच्या म्हणण्यानुसार, ती तिथे पोहोचली तेव्हा बाबा खोलीत होते. तीही खोलीत गेल्यावर बाबांनी तिला नको तिथे स्पर्श करायला सुरुवात केली. महिलेने नकार दिल्यावर बाबांनी तिला प्रसाद दिला. त्या प्रसादात भूल देण्याचे औषध मिसळले. प्रसाद खाल्ल्यानंतर महिला बेशुद्ध झाली. यानंतर बाबाने बंद खोलीत तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या महिलेने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आपले म्हणणे मांडले आहे. आणखी एका महिलेनेही बाबा विनोद कश्यप यांच्यावर असाच आरोप केला आहे.

विनोद कश्यप नावाचा हा बाबा काही वर्षांपूर्वीपर्यंत हॉस्पिटलमध्ये काम करत होता, पण नंतर त्याने नोकरी सोडून स्वतःचा आश्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा बाबा विवाहित असून त्याला ३ मुले आहेत. आता पोलिसांनी त्याला अटक केली असून आरोपांची चौकशी सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या-

मीरा बोरवणकरांनी उल्लेख केलेले मंत्री ‘दादा’ कोण? हे जनतेला कळाले पाहिजे – पटोले

भाजपा आरक्षण देऊ शकत नाही, सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसच आरक्षणाचा प्रश्न सोडवेल:- Nana Patole

चंद्रकांत पाटलांवर सोलापुरात शाईफेकीचा प्रयत्न, भाजपाविरोधात घोषणाबाजी; नेमकं काय घडलं?