Video: हार्दिकचा Attitude पाहून विराटच्या तळपायाची आग मस्तकात, भर मैदानात भिडले इंडियन क्रिकेटर्स

भारत विरुद्ध श्रीलंका (INDvsSL) संघात काल गुवाहाटी येथे खेळला गेलेला पहिला वनडे सामना (First ODI) चित्तथरारक राहिला. यजमानांनी ६७ धावांच्या फरकाने हा सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघाकडून ‘रनमशीन’ विराट कोहलीने (Virat Kohli) शतक झळकावले. आपल्या शानदार शतकी खेळीबरोबरच विराटच्या आणखी एका प्रसंगाने क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले आहे. भर मैदानात विराटला भारतीय खेळाडूवर राग आला आणि त्याने दिलेली रागीट रिऍक्शन (Virat Kohli Angry Reaction) कॅमेऱ्यात कैद झाली.

त्याचे झाले असे की, भारतीय संघाच्या डावातील ४३व्या षटकादरम्यान ही घटना घडली. या षटकातील चौथ्या चेंडूवर विराटने लेग साइडला हलक्या हाताने फटका मारला. चेंडू गॅपमध्ये गेल्याने त्याच्याकडे दोन धावा काढण्याची संधी होती. परंतु नॉन स्ट्राईकवर असलेल्या हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) एक धाव काढल्यानंतर स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यासाठी विराटला दुसरी धाव काढण्यास नकार दिला. हे पाहून दुसरी धाव घेण्यासाठी पळालेला विराट माघारी परतला.

मात्र हार्दिकचे असे वर्तन पाहून विराटचे डोके हटले. त्याने डोळे काढून हार्दिककडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरील हावभावांवरुन त्याच्या मनातील राग स्पष्ट दिसत होता. हार्दिकही त्यावेळी विराटच्या नजरेला नजर देऊ शकला नाही. हार्दिक आणि विराटमध्ये झालेल्या या छोट्या खडाजंगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

https://twitter.com/KuchNahiUkhada/status/1612809693294120961?s=20&t=FsBAGIpD1eHDsVkIAr02GQ

दरम्यान या सामन्यात विराटने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ८० चेंडूत १० चौकार १ षटकार ठोकत शतक झळकावले आहे. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील ४५वे शतक असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील एकूण ७३ वे शतक ठरले आहे. याबरोबरच विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा सक्रिय क्रिकेटपटूही आहे. शिवाय विराटचे हे श्रीलंका संघाविरुद्ध वनडेतील नववे शतक होते. श्रीलंकेविरुद्ध ४७ वनडे सामने खेळताना विराटने ही शतके केली आहेत.