Sanjay Raut | उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत? संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितले

Sanjay Raut | उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत? पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार पाठिंबा देतील, असे लक्षवेधी वक्तव्य शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. ते महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी अर्ज भरल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभेत इंडिया आघाडीला ३०० पेक्षा जास्त जागा मिळतील, तर राज्यात ३५ पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जमा होतील, असा विश्वास व्यक्त करताना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधानपदावर भाष्य केले.

उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत, याचा निर्णय इंडिया आघाडीत बसून घेतला जाईल. पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार पाठिंबा देतील. महाराष्ट्राला पंतप्रधान पदाचा मान का मिळू नये, असा थेट सवाल त्यांनी केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Shivajirao Adhalrao Patil Vs Amol Kolhe : आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांचा उद्या भोसरी विधानसभेत प्रचार दौरा

Baramati Loksabha | सुप्रिया सुळे आणि वहिनी सुनेत्रा पवार यांच्यात कोणाकडे आहे जास्त संपत्ती?

Madhav Bhandari | ‘देव-धर्माचा विषय शरद पवारांच्या “सात बाऱ्या’ वर कधीच दिसला नाही, त्यामुळे…’, माधव भंडारी यांचा टोला