शेंडी-जाणव्याच्या हिंदुत्वावर उद्धव ठाकरेंना अखेर सांगायचे काय? ते वारंवार अपमान का करतात?

बीड – शेंडी-जाणव्याचं हिंदुत्व (Hinduism) मला मान्य नाही असं वक्तव्य ठाकरे शिवसेनेचे प्रमुख मा.उद्धवजी ठाकरे (Uddhav Thackeray) अधुनमधुन करतात. त्यांची मुलाखत काल त्यांच्याच हाताखाली काम करणार्‍या संपादकांनी घेतली. त्यात देखील शेंडी-जाणव्याचा उल्लेख त्यांनी केला. अनेकदा जाहिर भाषणात देखील त्यांचं वक्तव्य विषयावर आलं. खरं तर असा उल्लेख त्यांनी करणं म्हणजे भारतीय हिंदु संस्कृतीचा अपमान तर आहेच त्यापेक्षा अधिका ब्राह्मण समाजासह इतरही काही समाजात मुंज सोहळे करण्याची परंपरा त्यांचा देखील अपमान असून जाणिवपुर्वक हा वारंवार ठाकरे करत असल्याचा आरोप भाजपाचे (BJP) राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी (Ram Kulkarni) यांनी केला.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, 2019 विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धवजी ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्री पदासाठी जनादेशाचा अपमान करत हिंदुत्व विचारापासुन फारकत घेतली. तेव्हापासून खर्‍या अर्थाने आपला चेहरा दाखविण्यासाठी आम्ही कसे धर्मनिरपेक्षवादी आहोत या प्रयत्नात ते गेले. खरं तर हिंदुत्व जो बाणा स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा होता त्यापासुन उद्धवजीनं दुर जाता कामा नये अशी प्रखर हिंदुत्ववाद्यांची इच्छा होती. पण सत्तेसाठी काहीही पण हा राजकारणाचा भाग असतो तो त्यांनी स्विकारला. भाजपवर टिका करताना त्यांनी मला शेंडी-जाणव्यांचं हिंदुत्व मान्य नाही असा नवा सुर काढला. जाहिर सभा, मेळावे एवढेच नव्हे तर त्यांच्या हाताखाली पगारी नोकरदार असलेल्या संपादकाने देखील काल दोन दिवसाची मुलाखत घेतली. त्यातही त्यांनी शेंडी-जाणव्याचा उल्लेख केला. यातुन त्यांना नेमकं सांगायचं काय?हे आता लोकांनी ओळखले.

असा उल्लेख म्हणजे खर्‍या अर्थाने ब्राह्मण समाज तथा भारतीय हिंदु संस्कृतीचा एक प्रकारे अपमान असल्याची टिका राम कुलकर्णी यांनी केली. खरं तर हिंदु संस्कृतीमध्ये शेंडी-जाणवे अर्थात शेंडी राखणे म्हणजे हिंदुत्व लक्षण आणि जाणवं म्हणजे ब्रह्म स्वरूप असा अर्थ अनादिकाळापासुन हिंदु संस्कृतीत ओळखल्या जातो. ऋषी मुनी काळापासुन देखील ही परंपरा चालत आलेली आहे. वर्तमानकाळात पौरोहित्य करणारे याचे अनुकरण मोठ्या प्रमाणावर करताना दिसतात. यज्ञोपवित अर्थात जाणवे हे तर महाराष्ट्रात सोनार, लिंगायत, कोमटी, सुतार यांच्यात देखील घातले जाते. मुंजीसारखे सोहळे देखील होतात. एक धार्मिक अनुष्ठान शास्त्रीय भाग म्हणावा लागेल. राजपुत समाजात ज्याला दुर्गान्व म्हटल्या जाते. एवढं पवित्र मानवी जीवनात आयुष्याला बळकटी देणारे शेंडी -जाणव्याची परंपरा असताना उद्धवजी ठाकरे यांच्याकडून सतत होणारा अपमान हा खर्‍या अर्थाने संतापजनक वाटतो.

राजकारणात समाजाचं व्यंगत्व आणणे हा खर्‍या अर्थाने सामाजिक गुन्हाच म्हणावा लागेल. पण या हिंदु संस्कृतीला राजकारणाणी जोडणं आणि आम्ही शेंडी-जाणव्याचं हिंदुत्व मानत नाहीत असं म्हणणं हाच खर्‍या अर्थाने भारतीय हिंदु संस्कृती रूढी परंपरेचा सुद्धा अपमान असल्याची टिका कुलकर्णी यांनी केली. मा.उद्धवजी ठाकरे यांनी अगोदर शेंडी आणि जाणवं याचा शास्त्रीय अर्थ समजुन घ्यावा असं त्यांनी म्हटले आहे. शेंडी राखणे हिंदुत्व लक्षण असेल तेही अनादिकाळापासुन आणि आता जर उद्धवजी ठाकरेंना मान्य नसेल तर हा स्व.बाळासाहेब ठाकरेंचा देखील अपमान असु शकत नाही का? असा खणखणीत सवाल कुलकर्णींनी विचारला आहे.