Nikhil Wagle Attack | महिलांना मारहाण, पोलीस हात धरुन उभे राहिले; महिलांचा आरोप

Nikhil Wagle Car Attack : भारतरत्न लालकृष्ण अडवाणी (Lalkrishna Advani) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagle) हे भाजपाच्या रडारवर आहेत. अशातच आता काल संध्याकाळी निखील वागळे (Nikhil Wagle Car Attack) यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. काही संतप्त कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आहेत. तसेच त्यांच्या गाडीवर शाईफेक आणि अंडी फेक देखील करण्यात आली आहे. संबंधित प्रकरामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पुण्यात काल ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेसंदर्भात काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं असून, सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. अशी माहिती पोलिसांच्या वतीनं देण्यात आली आहे. या प्रकरणी विश्रामबाग आणि डेक्कन जिमखाना पोलिस अधिक तपास करत आहेत. राष्ट्र सेवा दलाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी नव्हती असेही पोलिस विभागानं स्पष्ट केलं आहे.

या हल्ल्यात झालेल्या गोंधळात भाजपकडून महिलांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला आहे. आम्ही पोलिसांतची मदत मागत होतो. मात्र पोलीस मदत करायला तयार नव्हते. भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आमच्या अंगावर धावून आल्याचा आरोपही महिलांकडून करण्यात आला आहे. काही महिलांना जखमादेखील झाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

Nikhil Wagle | पुण्यात निखील वागळेंवर हल्ला, भाजप कार्यकर्त्यांनी पत्रकाराची गाडी फोडली

मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्र्यांचा डोळा असून सत्तासंघर्षातून महाराष्ट्राच्या हिताकडे दुर्लक्ष होत आहे

Nana Patole | महाराष्ट्रात गुंडाराज, सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा