मी कोरोना काळात जे घरात बसून केले ते तुम्ही सुरत गुवाहटीला जाऊन करु शकला नाहीत – ठाकरे 

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) महाविकास आघाडीची एकत्रित सभा पार पडलीअसून, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा भाजपवर निशाणा साधला आहे. मी काँग्रेस सोबत गेलो तर हिंदुत्व सोडले असेल तर मुफ्ती मोहम्मद सोबत गेल्यावर तुम्ही काय सोडले. तुम्ही म्हणाल तेच खर ही मस्ती संपविण्यासाठी मविआची वज्रमूठ असल्याचे त्यांनी सांगितले.

मविआ काळात केंद्र सरकारने मालक धार्जिणा कायदा आणला तो आपण महाराष्ट्रात लागू होऊ दिला नाही आता मिंधे तो लागू करण्याचा प्रयत्नात. कामगारांच्या कष्टावर देश उभा आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे सांगतात दिवाळी काळात गंगापूरला आलो होतो. अवकाळी पाऊस झाला. आपण बीड पॅटर्न आणण्याचा प्रयत्न करत होतो. शेतकऱ्यांची थट्टा हे सरकार करतय. विम्याचे पैसे मिळत नाही असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

मविआ काळात जे बोललो ते केले. पीक कर्जमुक्ती मविआ आल्यावर केली. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार आता मिळत नाही. मी कोरोना काळात जे घरात बसून केले ते तुम्ही सुरत गुवाहटीला जाऊन करु शकला नाहीत. मालेगावात कांदा उत्पादक शेतकरी. एका कांद्याला ५० खोके दिलेत पण शेतकऱ्यांना काहीच नाही असं ठाकरे यांनी म्हटले आहे.