INDvsPAK: विराट-राहुलच्या जोडीने पाकिस्तानी गोलंंदाजांची काढली पिसे, उभारला ३५६ धावांचा डोंगर

india vs pakistan: पावसाच्या व्यत्ययानंतर अखेर राखीव दिवशी भारतीय संघाने पाकिस्तानी गोलंदाजांची दमछाक करुन सोडली. विराट कोहली (virat kohli) आणि केएल राहुल (kl rahul) यांच्या जोडीने द्विशतकी भागिदारी करत मर्यादित ५० षटकात ३५६ धावा फलकावर लावल्या. यादरम्यान दोघांनीही वैयक्तिक शतके केली. परिणामी पाकिस्तानला आता विजयासाठी ३५७ धावांचे आव्हान मिळाले आहे. हा सामना जिंकल्यास भारतीय संघाचा अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग सोपा बनेल.

काल (१० सप्टेंबर) पावसाच्या अडथळ्यामुळे सामना पुढे ढकलावा लागला. तत्पूर्वी कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी वेगवान सुरुवात करत २४ षटकात १२३ केल्या होत्या. आज (११ सप्टेंबर) डाव पुढे नेताना विराट आणि राहुलनेही झंझावाती खेळी केल्या. विराट ९४ चेंडूत १२२ धावांवर नाबाद राहिला. यादरम्यान त्याने ३ षटकार आणि ९ चौकार मारले. तर दुखापतीनंतर पुनरागमन करत असलेल्या राहुलची बॅटही चांगली तळपली. त्याने १०६ चेंडूत २ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने नाबाद १११ धावा फटकावल्या. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी २३३ धावांची भागीदारी झाली.

https://youtube.com/shorts/H091HG5c0C4?si=mv9vdKMURQ-iS0qa

महत्त्वाच्या बातम्या-

संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी :- नाना पटोले

उद्धव ठाकरेंना यापुढे जाहीरसभेतून ‘घरकोंबडा’ म्हणावं लागेल – बावनकुळे

नरेंद्र मोदींच्या राज्यात एक माणूस सोडून कोणीही सुखी नाही :- नाना पटोले