.. म्हणून ते निवडणुका पुढं पुढं ढकलतात; अजित पवारांचा सरकारवर निशाणा

पुणे : राज्यातील महानगरपालिका,नगरपालिका, नगरपरिषद यासह अनेक निवडणुका रखडल्याने शिंदे सरकारवर विरोधक टीका करत आहेत. यातच आता विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनीही याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला आहे.सप्टेंबरच्या शेवटपर्यंत निवडणुका पुढं ढकलल्या जाणार होत्या. काही जिल्ह्यात परतीचा पाऊस ऑक्टोबरमध्ये पडतो. पण, त्याचा काही फारसा परिणाम मतदानावर होऊ शकत नाही.असं पवार यांनी म्हटलं आहे.

याबाबत अजित पवार म्हणाले, आम्ही सत्तेत राहिलो असतो, तर निवडणुका लागल्या असत्या. यांना प्रभाग चारचा की, तीनचा असा प्रश्न आहे. भाजप आणि शिंदे शिवसेना गट एकत्र निवडणुकीला सामोरे गेल्यानंतर काय कौल मिळेल. याबद्दल खात्री नसल्यानं ते निवडणुका पुढं पुढं ढकलतात. अस माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे प्रमुखांनी यासंदर्भातील नोंद घ्यावी. ताबडतोब निवडणुका जाहीर कराव्यात, अशी मागणही अजित पवार यांनी केली.