श्रीलंकेचा क्रिकेट समालोचक कुमारा संगकारा यांच्यावर रुबी हॉल क्लिनिकमध्ये यशस्वी उपचार

Pune – श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू कुमारा चोक्शानंद संगकारा (Kumar Sangakkara) आणि सध्याचे समालोचक यांना भारत-श्रीलंका (INDvsSL) सामन्याच्या एक दिवस आधी ४ जानेवारी रोजी संध्याकाळी अंग थरथर कापत असल्याने त्यांना संध्याकाळी ८ वाजता हिंजवडी (Hinjewadi) येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये (Ruby Hall Clinic) नेण्यात आले जेथे त्यांच्यावर डिहायड्रेशन आणि उच्च तापावर उपचार करण्यात आले. त्यांना काल सामन्यापूर्वी डिस्चार्ज देण्यात आला.

त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, डॉ. श्रीधर देशमुख रुबी हॉल क्लिनिकचे फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट म्हणाले, “घरीच डॉक्टरांना बोलावण्यात आले होते, जिथे त्यांना थंडी वाजून येणे, डोकेदुखी, आतड्यांमध्ये दाह आणि उच्च ताप आला असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये ते डिहायड्रेट झाल्याचे आढळून आले होते आणि १०३ डिग्री सेल्सिअस ताप होता. आम्ही त्यांना दवाखान्यात दाखल करून घेतले आणि त्यांना पुन्हा हायड्रेट केले आणि इतर सहाय्यक उपचार दिले गेले. आणि ते विषाणूजन्य डिहायड्रेशन आजारातून लवकर बरे झाले.”

रुबी हॉल क्लिनिकमधील आपल्या अनुभवाविषयी बोलताना श्रीलंकेचे क्रिकेट समालोचक कुमारा चोक्शानंद संगकारा म्हणाले, “रुग्णालयातील वास्तव्यादरम्यान माझी सर्वोतोपरी सर्वोत्तम वैद्यकीय आणि गैर-वैद्यकीय काळजी घेणाऱ्या अशा सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानू इच्छितो. याव्यतिरिक्त, मी डॉ श्रीधर देशमुख आणि त्यांच्या टीमचे आभार मानू इच्छितो जे अत्यंत सक्षम आणि अविश्वसनीय होते. प्रत्येक पैलूकडे लक्ष दिले गेले आणि मी चांगल्या हातात आहे हे जाणून मला सुरक्षित वाटले. मी रुबी हॉल क्लिनिकमधील सर्वांच्या अविस्मरणीय आठवणी घेऊन जात आहे आणि माझी प्रकृती पूर्ववत सुधारल्या बद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे.”