Jasprit Bumrah | “डिनरमध्ये काय बनवू?” बुमराह अन् पत्नी संजनाचा ऑनकॅमेरा रोमान्स, Video होतोय व्हायरल

Jasprit Bumrah | भारतीय क्रिकेट संघाने टी20 विश्वचषक 2024 मध्ये पाकिस्तानचा सहा धावांनी पराभव केला. मात्र हा विजय भारतासाठी सोपा नव्हता. एकवेळी पाकिस्तान हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते पण सामन्यादरम्यान एक टर्निंग पॉइंट आला आणि पाकिस्तान संघ जिंकूनही सामना हरला. 120 धावांच्या लक्ष्यासमोर पाकिस्तानचा संघ मजबूत दिसत होता. बाबर आझम सुरुवातीलाच बाद झाला. पण दुसरा सलामीवीर मोहम्मद रिझवान विकेटवर राहिला आणि जोपर्यंत तो राहिला तोपर्यंत पाकिस्तान संघ सामन्यात होता. पण 15 व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) पहिल्याच चेंडूवर रिजवानला बाद करून भारताला सामन्यात परत आणले. इथून पाकिस्तानचा संघ कमकुवत झाला.

बुमराहने संपूर्ण सामन्यात आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये 3.50 च्या इकॉनॉमी रेटने केवळ 14 धावा देत 3 विकेट्स काढल्या. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. प्रत्येक सामन्यानंतर आयसीसी कडून सामन्याचा हिरो ठरलेल्या खेळाडूंचे इंटरव्ह्यू घेण्यात येत असते. कालच्या सामन्यानंतर देखील जसप्रीत बुमराहचा इंटरव्ह्यू त्याचीच पत्नी संजना गणेशनने घेतला. दोघांनी एकदम प्रोफेशनल पद्धतीने इंटरव्ह्यू दिला पण शेवटी दोघांचे पती पत्नी प्रेम समोर आलेच जाताना बुमराह म्हणाला, “भेटू परत अर्ध्या तासात” तर संजना म्हणाली “डिनर मध्ये काय बनवू.” पत्नी-पत्नीमधील हा ऑनकॅमेरा प्रेमळ संवाद सर्वांच्या पसंतीस उतरताना दिसतोय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली शपथ, राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा

Modi’s Cabinet : महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; जाणून घ्या कुणाला मिळणार संधी?

Murlidhar Mohol : नगरसेवक, महापौर ते थेट केंद्रात मंत्री! मुरलीधर मोहोळांना लॉटरी!