‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, पीडितेचं नावही केलं उघड

 नवी दिल्ली-  प्रसिद्ध मल्याळम् अभिनेता-निर्माता विजय बाबूवर (Famous Malayalam actor-producer Vijay Babu) एका अभिनेत्रीचा बलात्कार केल्याचा आरोप (rape case) आहे आणि त्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तसंच एका फेसबुक लाईव्हमध्ये या पीडितेची ओळख जाहीर केल्याबद्दल विजय बाबूवर आणखी एक केस दाखल झाली आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यापासून हा अभिनेता बेपत्ता असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

विजय बाबूच्या प्रोडक्शन कंपनीच्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या एका अभिनेत्रीने 22 एप्रिलला पोलिसांकडे तक्रार केली आणि आपल्यावर झालेल्या कथित अत्याचाराची एक सविस्तर पोस्टही फेसबुकवर लिहिली. या अभिनेत्रीचं म्हणणं आहे की विजय बाबूने तिचं लैंगिक शोषण केलं आणि तिला मारहाणही केली. त्याने आपल्याला जबरदस्ती ड्रग्स घ्यायला लावल्याचा आरोपही तिने केला.