पंकजा मुंडे यांना डावलून ज्यांना उमेदवारी दिली त्या उमा खापरे नेमक्या कोण आहेत ? 

Mumbai – विधानपरिषद निवडणुकीसाठी (MLC election) भाजपने आपल्या चार उमेदरवांची नावे निश्चित (BJP decide four names for MLC Vidhan Parishad Election) केली असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी आपले चार उमेदवार निश्चित केले आहेत. यामध्ये प्रवीण दरेकर (Pravin Darekar), राम शिंदे (Ram Shinde), प्रसाद लाड (Prasad Lad) आणि श्रीकांत भारतीय यांच्यासह उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ (Pankaja Munde and Chitra Wagh) यांना मात्र संधी मिळालेली नाही, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवाल्या आहेत. दरम्यान, भाजप नेतृत्वानं अचानक  उमा खापरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना डावललं. खापरे यांच्यासाठीही हा धक्का होता.

खापरे या भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आहेत. त्यापूर्वी त्या महिला मोर्च्याच्या प्रदेश सचिव होत्या. तर, त्याअगोदर त्या दोन टर्म पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवक राहिलेल्या आहेत. २००१-०२ मध्ये पालिकेत त्या विरोधी पक्षनेत्या होत्या. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थक आणि जुन्या एकनिष्ठ भाजप पदाधिकारी पिंपरी-चिंचवडकर उमा खापरे यांना संधी देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. यानिमित्ताने पिंपरी-चिंचवडला तिसरा आमदार मिळणार आहे.