‘पंकजा मुंडे यांच्या नावासाठी देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळ्यांना खूप प्रयत्न केले होते, पण …’

Mumbai – विधानपरिषद निवडणुकीसाठी (MLC election) भाजपने आपल्या चार उमेदरवांची नावे निश्चित (BJP decide four names for MLC Vidhan Parishad Election) केली असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी आपले चार उमेदवार निश्चित केले आहेत. यामध्ये प्रवीण दरेकर (Pravin Darekar), राम शिंदे (Ram Shinde), प्रसाद लाड (Prasad Lad) आणि श्रीकांत भारतीय यांच्यासह उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ (Pankaja Munde and Chitra Wagh) यांना मात्र संधी मिळालेली नाही, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवाल्या आहेत. याबाबत बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्ही प्रयत्न केला होता असे म्हटले आहे.

विधानपरिषदेच्या १० जागासाठी भाजपाचे ५ उमेदार पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी घोषित केले आहेत. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांच्या नावाची घोषणा केली आहे. आमच्या पक्षामध्ये आम्ही कोरी पाकिटे असतो त्यावर जो पत्ता लिहिला जातो तेथे आम्ही जातो. त्यामुळे राजकारणामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या कार्यकर्त्याने इच्छा व्यक्त करायची असते. पण निर्णय संघटना घेते, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

केंद्रीय संघटनेने घेतलेला निर्णय हा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून सर्वांनी मान्य करायचा असतो. पंकजा मुंडे यांच्या नावासाठी देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळ्यांना खूप प्रयत्न केले होते. पण केंद्रीय संघटनेने त्यांच्याबाबत काही भविष्यातील विचार केला असेल. कार्यकर्त्यांची नाराजी क्षणभराची असते,असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. पंकजा मुंडे या मध्य प्रदेश भाजपाच्या सहप्रभारी आहे. मध्य प्रदेश हे मोठं राज्य आहे. त्यांच्यासाठी आणखी काही जबाबदारी केंद्रीय नेतृत्वाच्या कल्पनेमध्ये असेल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.