लग्नाआधी ‘या’ ७ लोकांना दीपिका पादुकोणने केलंय डेट, क्रिकेटर धोनी ते अभिनेता रणबीरचा यादीत समावेश

Deepika Padukone Dating List: बॉलिवूडमध्ये आपल्याला दररोज कोणत्या ना कोणत्या अभिनेत्याच्या अफेअरबद्दल ऐकायला मिळते. काही बॉलीवूड अभिनेत्रींबद्दल बोलायचे झाले तर त्यांची डेटिंग लिस्ट इतकी मोठी असते की त्यापेक्षा आपल्या आयुष्यात आपले मित्र कमी असतात. तुम्हाला माहिती आहे का की दीपिका पदुकोणने लग्नाआधी ७ लोकांना डेट केले आहे. होय, या लांबलचक डेटिंग लिस्टमध्ये काही क्रिकेटर्स तर काही बिझनेसमन आहेत.

सर्वप्रथम मुज्जमिल इब्राहिमबद्दल बोलूया. दीपिकाने २००० मध्ये मॉडेल-अभिनेता मुज्जमिल इब्राहिमला डेट केले होते. यानंतर अभिनेत्रीच्या उपेन पटेलसोबतच्या अफेअरच्या बातम्याही चर्चेत होत्या. दीपिकाने तिच्या करियरच्या शानदार दिवसांमध्ये बिझनेसमन निहार पंड्याला डेट केले होते. मात्र, आता निहार पांड्याने गायिका नीती मोहनसोबत लग्नगाठ बांधली आहे.

यादी अजून बाकी आहे!
याशिवाय दीपिका आणि सिद्धार्थ मल्ल्याचा व्हायरल किसिंग व्हिडिओ तुम्हाला आठवत असेल. आयपीएल सामन्यादरम्यान हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यांच्या अफेअरच्या चर्चांना वेग आला होता. क्रिकेटर्सबद्दल बोलायचे झाले तर, दीपिकाने तिच्या बॅचलरच्या काळात एमएस धोनी आणि युवराज सिंगला डेट केले आहे. आणि रणबीर कपूरला तुम्ही कसे विसरू शकता. दीपिका आणि रणबीरने (Deepika Padukone and rabir kapoor) आपल्याला दिलेले कपल गोल विसरणे खूप कठीण आहे. रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतरच दीपिकाने १४ नोव्हेंबर २०१८ मध्ये अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्न केले.

महत्वाच्या बातम्या-

इश्क पर किसका जोर! काकूच्या प्रेमात वेडा झाला पुतण्या, पळून जाऊन लग्नाचं केलं प्लॅनिंग; पण…

मराठा आरक्षणाबाबत सरसकट निर्णय घ्या!- अशोक चव्हाण

रामा राघव फेम अभिनेत्री श्रद्धा पवारचं ‘प्रपोज’ हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला