कोण शरद पवार? मी त्यांना ओळखत नाही; केंद्रीय मंत्र्याचे धक्कादायक वक्तव्य

सातारा : “शरद पवार (Sharad Pawar) यांना मी ओळखत नाही. 5 ते 6 खासदार असणाऱ्या पक्षाला आम्ही गृहीत धरत नाही, असं केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) म्हणाले. तसेच शरद पवार यांनी माझ्या मतदारसंघात येऊन निवडणूक लढवून दाखवावी”, असे प्रतिआव्हान अजय मिश्रा यांनी दिलं आहे.

काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अजय कुमार मिश्रा यांच्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारले होते यानंतर शरद पवारांनी कोण मिश्रा? मी त्यांना ओळखत नाही, अशी टीका केली होती. त्याला मंत्री अजय कुमार मिश्रा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.